Blogroll

मराठी भाषेला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा, अभिजात भाषा म्हणजे काय? त्याचा काय फायदा होईल?

 "मराठी भाषेला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा, अभिजात भाषा म्हणजे काय?" 

मराठी भाषेला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा: निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय मराठी भाषेला देण्यात आला अभिजात भाषेचा दर्जा! तर आपण या आर्टिकल मधून जाणून घेणार आहोत की अभिजात भाषा म्हणजे काय? त्या अभिजात भाषेला दर्जा कसा मिळतो? त्याचे फायदे काय? आपण सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया!


मराठी भाषेला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा, अभिजात भाषा म्हणजे काय?



माझा मराठाचि बोलु कौतुके।
परि अमृतातें ही पैजा जिंके ॥


समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!!


अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! 


मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे महाराष्ट्र साठी गौरवाची बाब आहे. सर्व महाराष्ट्राने केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून पासून ही मागणी सुरू होती. आता त्या प्रयत्नांना यश आले आहे. यापूर्वी 6 भाषेला अभिजात भाषेचा मिळाला होता, त्यात तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगु, मल्याळम आणि उडिया या भाषेचा समावेश आहे. तर आता मराठीसह बंगाली, आसामी, प्राकृत, पाली या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. 



2012 साली ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारला अहवाल देण्यासाठी एक समिती नेमली गेली होती. त्या समितीने आपला अहवाल 2013 साली प्रकाशित केला होता. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी चळवळ उभी करण्यात आली होती. राज्य सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती देखील नेमली होती. या समितीने ५०० पानांचा अहवाल केंद्राकडे सादर केला होता. ज्यात मराठी भाषा वैशिष्ट्यपूर्ण असून ती अभिजात भाषेचे सर्व निकष पूर्ण करते याचे पुरावे देण्यात आले होते. साहित्यिक रंगनाथ पाठारे यांच्या अथोनात प्रयत्नानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. 



भारत सरकारने भाषांना अभिजात भाषा हा नवी श्रेणी काढण्याचा निर्णय 12 ऑक्टोबर 2004 ला घेण्यात आला. त्यात तामिळ भाषेला पहिल्यांदा हा दर्जा देण्यात आला.



अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काय नियम व अटी आहेत:



  • भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावी.
  • भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना हवा.
  • भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी. 
  • अभिजात' भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.
  • भाषेचा आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा.


अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्याचे फायदे काय:

  • अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज्याला अनुदान दिले जाते.
  • अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
  • अभिजात भाषेचा दर्जा मिळल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येते.
  • अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.
  • प्राचीन ग्रंथ अनुवादित केले जातात. 
  • मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती आणि विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत केली जाते.





खरोखरच ही महाराष्ट्र साठी व महाराष्ट्रातील लोकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. हे सर्व राज ठाकरे यांच्या प्रयत्नामुळे शक्य झाले आहे. पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक अभिनंदन!'मराठी भाषेला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा, अभिजात भाषा म्हणजे काय?'



ज्ञानेश्वर माऊली वर्णन केलेल्या मराठी भाषेला जवळपास 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. मराठी भाषा ही ११ व्या शतकातील आहे असे आजपर्यंत मानले जात होते. परंतु वाशीमचे महाकवी गुणाढ्य यांनी नोकरीनिमित्त जम्मू काश्मिरात जाऊन तेथील राजदरबारी सेवा चाकरी करत बृहकथा हे महाकाव्य लिहिले. या काव्यातच मराठीचे आद्यरुप असलेली पैश्याची भाषा आली आहे.
या बृह‌कथाचे सोमदेव यांनी संस्कृत भाषेत ११ व्या शतकात भाषांतर केले. त्यामध्ये महाकवी गुणाढ्य यांची पूर्ण बायोग्राफी दिली. त्याचे मराठीत भाषांतर ह.अ. भावे यांनी कथासरित्सागर या नावाने ५ खंडांत केले. त्याला प्रस्तावना दुर्गा भागवत यांनी दिली होती. रामायण, महाभारत महाकाव्यानंतर बृहकथा हे जगातील प्रसिध्द असे तिसरे महाकाव्य होय.



संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ अशा अनेक संतांनी मराठी भाषेला चांगला दर्जा दिला. त्यांनी अनेक मराठीतून ग्रंथ लिहिले. आपली मराठी कशी पुढे जावे यावर त्यांनी लक्ष दिले म्हणूनच आपण गर्वाने सांगू शकतो की ही आपली मराठी आहे.आजपर्यंत मराठी भाषा ही संस्कृत भाषेची मुलगी मानली जात होती पण यामुळे मराठी भाषा ही संस्कृतइतकीच जुनी व स्वतंत्र असल्याचे सिध्द झाले. मराठीमध्ये साहित्य निर्मिती संदर्भात तर बोलायलाच नको. महाकवी गुणाढ्य, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव यांच्यासारख्या दिग्गजांच्या साहित्यांनी मराठी भाषा समृध्द झाली.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यावर दगडावर शिलालेख लिहिलेले आहेत ते आजही आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या महाराष्ट्रात अनेक महान थोर होऊन गेले ज्यांनी यांनी मराठीला चालना दिली. मराठी भाषेला पुढे नेण्याचा प्रयत्न केला अशा अनेक थोर व्यक्तींचे आभार मानतो. मला गर्व आहे मी मराठी असल्याचा खरच खूप आनंद होतो. 


मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी आपण अजून मराठी भाषेला पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वांना अभिमान असला पाहिजे की आपण मराठी असल्याचा. आपण आपल्या मुलांना मराठी शाळेत शिकवले पाहिजे आणि मराठी बोलायला विसरायचं नाही तसं तुम्हाला काय सांगायची गरज नाही तर चला मग आपल्या मराठीला पुढे नेऊया! 

धन्यवाद मित्रांनो तर तुम्हाला हा लेख कसा वाटला? जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजला भेट द्या.



Post a Comment

0 Comments