प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेच्या 20 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हा हप्ता ऑगस्ट 2025 मध्ये जारी केला जाणार आहे. यापूर्वी, फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 वा हप्ता जारी केला होता.
Pm किसान चा 20 वा हफ्ता मिळण्यासाठी e-kyc आवश्यक आहे, तरी शेतकऱ्यांनी e-kyc करून घ्यावी.
योजनेचे फायदे
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपये, म्हणजे वार्षिक 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च अशा तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जातो. ही योजना 2019 च्या अंतरिम अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केली होती आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केली होती. ही आता जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना बनली आहे.
लाभार्थ्यांना अशी तपासता येईल स्थिती
pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
Know Your Status वर क्लिक करा.
तुमचा नोंदणी क्रमांक, कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि Get Data पर्याय निवडा.
तुमची स्थिती दिसेल.
पीएम किसान योजनेसाठी अर्ज कसा करावा.
pmkisan.gov.in वर जा.
नवीन शेतकरी नोंदनी साठीची प्रक्रीया
New Farmer Registration' वर क्लिक करा आणि आधार क्रमांक टाका.
पीएम किसान अर्ज फॉर्म 2024 मध्ये विचारलेली माहिती भरा, ती जतन करा आणि भविष्यासाठी प्रिंटआउट घ्या. या योजनेशी संबंधित नवीनतम माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
योजना नाव
Pm किसान सन्मान निधी योजना
अधिकृत वेबसाईट
20 वा हफ्ता installment तारीख
02/ऑगस्ट/2025
मागील एकूण हफ्ते
19

0 Comments
कोणत्याही सरकारी योजनेची संबंधित नाही किंवा कोणत्याही सरकारी योजनेचे अधिकृत वेबसाईट नाही. हे प्रायव्हेट वेबसाईट असून तरी आपण माहिती बरोबर आहे का हे तपासून पहावी.