"नमो शेतकरी योजनेचा 6 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ! पुढील हप्त्यात 2000 की 3000 रुपये जमा होणार ?"


नमो शेतकरी योजना: नमो शेतकरी ही योजना राज्य शासनाने सुरू केलेली योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात तसेच या योजनेचे तीन टप्प्यांमध्ये दोन- दोन हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी या योजनेचे मिळून शेतकऱ्यांना वर्षाला 12000 रुपये राशी दिली जाते.

नमो शेतकरी योजनेचा 6 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ! पुढील हप्त्यात 2000 की 3000 रुपये जमा होणार ?


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचे जे शेतकरी निष्कर्षात बसतात म्हणजेच जे लाभार्थी आहे तेच नमो शेतकरी योजनेचा साठी सुद्धा पात्र आहेत. शेतकऱ्यांना अजून सहा हजार रुपये चा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी ही योजना सुरू केली. 


नमो शेतकरी योजनेचे पाच हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. शेतकरी 6 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना च्या हप्त्याचे वितरण झाले आहे तरी अजून नमो शेतकरी योजनेचा हप्ता पडला नसून शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते की नमो शेतकरी योजना बंद पडली की काय? सरकारची तिजोरी खाली झाली की काय? लाडकी बहिणी योजनेमुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता पडतो की नाही अशी चिंता शेतकऱ्यांच्या मनात येत होती.'नमो शेतकरी योजनेचा 6 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ! पुढील हप्त्यात 2000 की 3000 रुपये जमा होणार ?'


याच अनेक प्रश्नांवर सरकारने सुट्टी दिली आहे अन् अखेर 'नमो शेतकरी महासन्मान'च्या सहाव्या हप्त्यासाठी १ हजार ६४२ कोटी रुपये निधीला मंजुरी देण्यात आली आहे. आता हे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वितरित होणार आहेत. आता गुढीपाडव्याच्या सण जवळ आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना गुढीपाडव्याची गोड बातमी सरकारने दिली आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. तरी शेतकऱ्यांना गुढीपाडवा सणाच्या पूर्वी नमो शेतकरी योजनेचा वितरण केलं जाऊ शकते.


शेतकऱ्यांना प्रश्न पडत आहे की या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना किती रुपये राशी दिली जाईल. 2000 कि 3000 हजार रुपये शेतकऱ्यांना प्राप्त होतील. तर शेतकऱ्यांना दोनच हजार रुपये मिळणार आहेत कारण सरकारने अजून काही 3000 रुपये बद्दल जीआर अपडेट केला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये वितरित केले जाणार आहेत. तर लवकरात लवकर शेतकऱ्यांना 6 व्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा होणार आहेत.


अशाच नवनवीन अपडेट साठी आपल्या पेजला भेट द्या आणि ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.