"लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे ! 26 जानेवारी च्या आत मिळणार 7 वा हप्ता ! 2100 रुपये कधी मिळणार?"
लाडकी बहीण योजना: आता जानेवारी महिना सुरू होऊन बरेच दिवस झाले तर अजून लाडकी बहीण योजनेचा हप्ता पडला नाही, महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार का ? कधी मिळणार ? 2100 रुपये मिळणार का ? व कधी मिळणार ? तर आपण या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया!
आत्ताच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना ही सरकारसाठी महत्त्वाची ठरली आहे. लाडकी बहीण या योजनेमुळे सरकारला म्हणजेच महायुती सरकारला यश प्राप्त झाले आहे. सरकारने निवडणूक झाल्यानंतर लगेच डिसेंबर या महिन्याचा हप्ता वितरित केला आहे पण आता जानेवारी महिन्याचा अजून हप्ता वितरित करण्यात आला नाही तर लवकरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांना प्राप्त होणार आहे. 'लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे ! 26 जानेवारी च्या आत मिळणार 7 वा हप्ता !'
लाडकी बहिणींना योजनेच्या 2100 रुपये हप्ता मिळणार असे शासनाने निवडणुकीच्या वेळेस आश्वासन केले होते पण अजूनही 2100 रुपये लाडकी बहिणींना मिळाले नाहीत तर हे 2100 रुपये कधी मिळणार याबद्दल अपडेट आले आहे. लाडकी बहीण या योजनेचे तपासणी होणार होती पण महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे की या महिन्यात तरी कोणतीही अर्जाची छाननी होणार नाही आणि पहिले जेवढ्या महिला या योजनेस प्राप्त होत्या तेवढ्याच महिला आता पण या योजनेस पात्र राहतील. पुढील महिन्यात अर्थसंकल्प झाल्यानंतर अर्जाची छाननी होऊ शकते असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केल आहे.
महिलांना 2100 रुपये जानेवारी महिन्याच्या हप्त्यात तरी मिळणार नाहीत. पुढील महिन्यातील अर्थसंकल्पात 2100 रुपये महिलांना देण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते. त्यामुळे तरी या महिन्यात लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना या महिन्यात 1500 रुपयेच मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन त्यावर विचार करून त्याबाबत निर्णय घेतील. त्यानंतर यात काही अट पण ऍड केल्या जाऊ शकतात तरी सध्या तरी महिलांना काळजी करण्याची गरज नाही.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे की 26 जानेवारी च्या आत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता प्राप्त होणार आहे म्हणजेच सातवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. तर ही महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्या महिलांची अजूनही डीबीटी लिंक अकाउंट केले नसेल तर लवकरात लवकर महिलांनी बँक अकाउंट हे डीबीटी लिंक करून घ्यावे म्हणजेच आधार कार्ड हे बँकेची सलग्न करून घ्यावे. दोन-चार दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रोसेस चालेल अशी माहिती दिली आहे. म्हणजेच अंदाजे 20 तारखेपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल.
अशाच नवनवीन अपडेट साठी आपल्या पेजला भेट द्या आणि ही माहिती आवडली असल्यास तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

0 Comments
कोणत्याही सरकारी योजनेची संबंधित नाही किंवा कोणत्याही सरकारी योजनेचे अधिकृत वेबसाईट नाही. हे प्रायव्हेट वेबसाईट असून तरी आपण माहिती बरोबर आहे का हे तपासून पहावी.